Dr. BabasahebAmbedkar Library >> Recent Arrivals

सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया - चंद्रकांत भुजबळ

महाराष्ट्र हे देशातील सहकार चळवळीतील अग्रगण्य राज्य आहे. आपल्याकडे सहकार चळवळ समाजातील सर्व स्तरात विस्तारलेली आहे. शेती,अर्थ, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रात ‘एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ’ या युक्तीची प्रचीती ख-या अर्थाने सहकार क्षेत्रात पहायला मिळत आहे.
सहकार क्षेत्रात होणारे बदल हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. व या बदलांच्या अनुषंगाने निर्माण होणारी आव्हाने पेलण्याच्या दृष्टीने व सहकारातील लोकशाहीमूल्य जपण्यासाठी ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र सहकार कायद्यात अमुलाग्र बदल झालेले दिसतात.
सहकार चळवळीतील संस्थेचे नेतृत्व पारदर्शी पध्दतीने निवडण्याच्या दृष्टीने केंद्रातील निवडणूक आयोगा प्रमाणे स्वतंत्र निवडणूक आयोग अस्तित्वात आला. राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पारदर्शीपणे निवडणूक होण्यासाठी त्याची भरीव मदत होताना दिसते. श्री चंद्रकांत भूजबळ यांनी अत्यंत सोप्या भाषेत व मराठीत लिहिलेल्या पुस्तकाचा लहानात लहान संस्थे पासूनसर्वांनाच फायदा होईल व सहकार क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांला आपली भूमिका ठरवण्यास मदत होईल.चरैवेति! चरैवेति!! - राम नाईक

महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त गावातील शिक्षकाच्या पोटी जन्मलेल्याने पदवीनंतर नोकरीच्या शोधात मुंबई गाठावी ही झाली चाकोरी; पण या चाकोरीबध्द जीवनाला अनपेक्षित कलाटणी देत ऐन पस्तिशीत संघटनेचे काम करण्यासाठी नोकरीवर पाणी सोडून अवाढव्य मुंबईचे नेतृत्व करुन सलग आठ निवडणुका जिंकण्याचा विक्रम करणारे, कर्करोगावर मात करुन बोनस आयुष्य जगताना केंद्रीय मंत्री बनून देशभर आपल्या कामाची छाप पाडणारे, स्वत:हून निवडणूक संन्यास घेतल्यानंतर वयाच्या ८१ व्या वर्षी देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे–उत्तर प्रदेशचे–राज्यपाल म्हणून आजही दिवासाचे १२-१२ तास काम करणारे राम नाईक म्हणजे आश्चर्यच ! सलग वर्षभर दैनिक ‘सकाळ’ मधील सदरातून आपल्या जीवनातल्या आठवणी त्यांनी उलगडल्या. त्याच लेखांचे हे संकलन.लढ- संयुक्त महाराष्ट्राचा - रविकिरण साने

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांनी, पत्रकारांनी त्यावर विपुल लेखन केले असले, तरी ते बरेचसे एकांगी, आत्मसमर्थन करणारे आहे. संशोधकांनी अस्सल कागदपत्रांचा मागोवा घेत ग्रंथ प्रकाशित केले आहेत. तरीही या लढ्याचा समग्र आणि तटस्थ मागोवा घेणा-या ग्रंथाची उणीव भासत होतीच. ही मह्त्त्वाची कामगिरी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रविकिरण साने यांनी या ग्रंथाच्या रुपाने केली आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम म्हणजेच फक्त लढा, असा एकांगी विचार न करता कॉग्रेसच्या प्रयत्नांचीही साधार माहिती या ग्रंथात आहे. मराठी कॉग्रेस नेत्यांचे प्रयत्न का व कसे फसले आणि हा लढा विरोधी पक्षांच्या हाती कसा गेला. हा इतिहास समजून घ्यायला हवा. त्यासाठीच हे ग्रंथलेखन.THOUGHTS GALLERY

Dr. Sunil Gupta
This book is about basic issues that define our country’s course of development. In a diverse cross-section of topics, the author discusses in his inimitable style the fundamental flaws that have beset the nation’s inexorable march to progress and prosperity. He also elaborates how a shift in the positions of individual members of society on different issues could cause a qualitative difference in the course of events and thereby lead to a better tomorrow.बांग्लादेशी घुसखोरी - ब्रिगेडियर हेमंत महाजन

मुंबईतील आझाद मैदानावरील दंग्यानंतर एक मार्मिक एसएमएस आला. उत्तर कोरियात तुम्ही घुसखोरी केली तर तुम्हाला १२ वर्षे सक्तमजुरी मिळेल. इराणमध्ये घुसखोरी केली तर आजीवन कारावासाची शिक्षा होते. अफगाणमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर बंदुकीची गोळी घातली जाते. सौदी अरेबियात कारावासाची शिक्षा होते. चीनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर तुमचा पत्ता कधी लागत नाही. मात्र भारतात घुसखोरी केली तर तुम्हाला रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना आणि पासपोर्ट मिळेल! मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्यसुविधाही मिळतील, नोकरीत आरक्षणही दिले जाईल. तुम्ही आमदार, खासदार, मत्री बनाल. घुसखोरीमुळे आधीच घडून आलेले वाईट परिणाम कसे कमी करता येतील, त्याकरता व्यवहार्य पावले कशी उचलता येतील. या बाबतच्या शिफारशी या पुस्तकात केलेल्या आहेत.संशोधक निसर्गयात्री - मिलिंद आमडेकर

बिल लिशमन सारखा पक्षीवेडा रान बदकांच्या पिल्लांना स्थलांतर शिकवण्याचा ध्यास घेतो. त्यासाठी स्वत: आधी एक आसनी विमान चालवायला शिकतो. मग त्या पिल्लांना विमानामागून उडायला शिकवतो. नंतर त्यांना ३५०० कि. मी. दूर अंतरावर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन घेऊन जातो. त्याचा हा ध्यास म्हणूनच वाचण्यासारखा आहे. निसर्गाचा अभ्यास करणारे, त्यांची नोंद करणारे, त्यांचं वर्गीकरण करणारे असे अनेक छांदिष्ट, अभ्यासक. संशोधक यांना हा ग्रंथ प्रेरणा देईल.मुद्रणपर्व -दीपक घारे

१९६२. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युध्दात आपला दारुण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली. म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'!
चीनवर नको तेवढा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते? की राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी? 'या युध्दात नेमके काय घडले, कसे घडले आणि का घडले?
प्रत्यक्ष रणक्षेत्राची व व्यूहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय आहे. हा ग्रंथ देशहिताबद्दल कळकळ असणा-या प्रत्येकाने वाचायला हवा.

कविता सखी - सुधीर मोघे

आयुष्यभर कवीधर्म हाच स्वधर्म मानणारा सुधीर एका क्षणी कविता लिहू लागला. आणि मग लिहितच राहिला. काळाच्या ओघात अनेक क्षेत्रं, माध्यमं समोर येत गेली. या सर्वाच्या अनेकानेक वेगळ्या भूमिका आणि धर्म होते. पण त्यात त्याचा कवीचा मूळ पिंड कधीच हरवला नाही. सुधीर मोघे नामक कलंदर आणि मनस्वी कवीच्या या लेखनाचं मूलभूत सूत्र कविता हेच आहे. पण रुढ सांकेतिक अर्थानं, ते केवळ कवितेपुरतंच मर्यादित नाही. तर कवितेच्या बहुरुपी विश्वाचा, एकूण जगण्याच्या आणि त्यामुळे स्वत:च्याही थोडं आत उतरण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आयुष्यभर कवितेशी इमान राखणा-या एका स्वच्छंद पण अत्यंत मनस्वी कवीचं हे गाजलेलं, लोकप्रिय सदर... जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याला भरभरुन साथ देणारी त्याची ‘कविता सखी’…असाही पाकिस्तान - अरविन्द गोखले

अरविंद गोखलेचं हे पुस्तक म्हटलं तर पाकिस्तानाविषयी आहे आणि म्हटलं तर भारतीय उपखंडांतील सांस्कृतिकतेविषयी आहे. राजकारणाच्या चौकटीबाहेर आणि तरीही राजकीय तणावांच्या परिघावरचं लोकजीवन हा या लेखसंग्रहाचा आशय आहे.दि.वि. गोखले - व्यक्तित्व व् कर्तृत्व- सौ नीला वसंत उपाध्ये

ज्येष्ठ पत्रकार (कै.) दिनकर विनायक तथा दि. वि. गोखले हे युध्दशास्त्राचे गाढे अभ्यासक, क्रीडाप्रेमी होते. शिवाय कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या प्रारंभापासूनच त्यातील दर्जेदार प्रगल्भ विचारांचा पाया घालण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता
अफाट लोकसंग्रह आणि सर्वांप्रती समभाव ही त्यांची वैशिष्टये. त्यामुळेच वाचकांना या साध्या, चारित्र्यसंपन्न व सत्त्वशील पत्रकाराबद्दल या पुस्तकातील लेखसंकलनातून, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि समृध्द व्यक्तिमत्त्वाचा परिचय होईल. नव्या पिढीच्या पत्रकारांना एक आदर्श गवसेल...भोपाळमधील काळरात्र

२ डिसेंबर १९८४
भोपाळच्या युनियन कार्बाइड कारखान्यात स्फोट. विषारी वायू भोपाळभर पसरला. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. शेकडो लोक अपंग झाले, या कोलाहलात शेतमजूर ते पाश्चात्य इंजिनीयर सगळेच भरडले गेले. हे सारे कसे घडले? का घडले? उद्ध्वस्त समाजजीवन, सामाजिक रेटे ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी!अस्वस्थ वसुंधरा - नरेंद्र बोडके

" अस्वस्थ वसुंधरा " हा अग्रलेखसंग्रह अभ्यासक तसेच पत्रकारितेतील विद्यार्थी यांच्या दृष्टीने मौलिक ठरेल. पत्रकार नरेंद्र बोडके यांनी आपल्या पत्रकारितेच्या जीवनात अनेक प्रसिध्द मराठी दैनिकात लिहिलेल्या असंख्य अग्रलेखांपैकी काही विविध विषयांवरील निवडक अग्रलेख...होली वॉर : जिहाद व धर्मांतर

इस्लाम व ख्रिश्चॅनिटी या सेमेटिक रिलीजन्सचा अभ्यास करतांना धर्मशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान या सर्व बाजूने मिथस्, डॉग्मॉज, रिच्युअल्स, तसेच या धर्माचा उगम, उदय, विकास, प्रसार, प्रचाराचे-मार्ग, कारणे, उद्देश याचा सखोल व तपशीलावर अभ्यास होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दुर्मिळ माहितीचा व श्रेष्ठ विज्ञानांच्या दुर्मिळ लेखांचा हा संग्रह.न सांगण्याजोगी गोष्ट

१९६२. साम्यवादी चीनबरोबरच्या त्या वर्षीच्या युध्दात आपला दारुण पराभव झाला. जगभर त्यामुळे आपली मानहानी झाली. म्हणून ती ठरली 'न सांगण्याजोगी गोष्ट'!
चीनवर नको तेवढा विश्वास टाकणारे भोळेभाबडे राज्यकर्ते? की राणा भीमदेवी थाटात 'फॉरवर्ड पॉलिसी' आखणारे सेनाधिकारी? 'या युध्दात नेमके काय घडले, कसे घडले आणि का घडले?
प्रत्यक्ष रणक्षेत्राची व व्यूहरचनांची कल्पना देणारे २५ नकाशे हे या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय आहे. हा ग्रंथ देशहिताबद्दल कळकळ असणा-या प्रत्येकाने वाचायला हवा.

प्राचीन भारतीय व्यापार - डॉ. बी. आर. आंबेडकर

भारतीय सामाजिक समस्या - प्रा. अशोक गोरे

डॉ. बाबासाहेब अंबाडेकर यांची गाजलेली भाषणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

गावोगावी नाक्षत्रवने, घरोघरी आराध्यवृक्ष - वृक्षमित्र प्रकाश काळे

क्षण आला भाग्याचा

Great Game East India, China and the struggle for Asia's most volatile frontier - Bertil Lintner

Making One Plus One Eleven: Some Innovative Experiences of Tripura - Dr. Sanjay Kumar Panda-IAS

Our Future: Consumerism or Humanism - J. C. Kapur

कॉंग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? - शेषराव मोरे

असाही पाकिस्तान - अरविंद गोखले

सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग - शेषराव मोरे

मला समजलेले पाच हिंदू धर्म - शरद बेडेकर

भारतमातेसंबंधी विचारमंथन - प्रा. केशव आचार्य

मानवी वर्तन - मानसशास्त्रीय जाण व समुपदेशन - प्रा. चंद्रशेखर देशपांडे

लोकमान्य टिळक - धनंजय कीर

सचिन तेंडुलकर - प्लेईंग इट माय वे

सरदार वल्लभभाई पटेल - भारताचा पोलादी पुरूष - लेखक - बलराज कृष्णा - अनुवाद - भगवान दातार

गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा (वर्णद्वेशी गुलामगिरीचा अमानुष प्रवास) - अच्युत गोडबोले, अतुल कहाते

व्यावहारिक उपयोजित मराठी आणि प्रसारमाध्यमे - संपादन - डॉ. संदीप सांगळे

Rajdeep Sardesahi - 2014 (The Election that changed India)

फील्ड मार्शल सॅम माणेकशा (भारतीय लष्कराचा मानबिंदू) - मेजर जनरल शुभी सूद - अनुवाद भगवान दातार

Afghanistan After 2014 - Editor - Shrikant Paranjpe, Rajendra Abhyankar

India's Foreign and Security Policy: Challenges and Opportunities - Edited by Shrikant Paranjpe

एकच आयुष्य पुरेसे नाही - के. नटवर सिंग

के. नटवर सिंग त्या काही मोजक्या लोकांपैकी एक आहेत, ज्यांना हे माहीत आहे, की सोनिया गांधींनी २००४ मध्ये मनमोहन सिंगांना का पंतप्रधान केले. वादांशी त्यांचे नाते नवीन नाही. के. नटवर सिंग यांनी सार्वजनिक जीवनात मोठी यशस्वी आणि महत्त्वाची बारी खेळली आहे. एकच आयुष्य पुरेसे नाही.. भारतीय राजकारणाच्या रंगमंचावरील महत्त्वाचे पात्र राहिलेल्या व्यक्तीच्या जीवनाची प्रामाणिकपणे लिहिलेली सडेतोड, वास्तव आणि सविस्तर कथा आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रतिमा स्पष्ट दिसते.


१८५७ दृष्टिकोण व् मतानतरे - डॉ अशोक मोडक

८१५७ च्या भारतीय उठावाकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहते त्यावरून त्या लेखकाचा मनोदय अगदी स्पष्टपणे दिसून येतो. १८५७ च्या घटनेला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रीय स्फूर्तिगाथा म्हणून तिचे वर्णन केले तर आपले एक विद्वान प्रा. न. र. फाटक यांनी ‘शिपाईगर्दी’ संबोधून त्या घटनेची संभावना केली. अशीच मतमतांतरे अन्य देशी विदेशी अभ्यासकांनीही व्यक्त केलेली आहेत. त्यांचा साद्यंत परामर्ष घेणारा हा लेखसंग्रह.


सामन्यांतले असामान्य - सुधा मूर्ति

सुधा मूर्ती यांचं नर्मविनोदी शैलीतलं वैशिष्टयपूर्ण पुस्तक मराठीत! उत्तर कर्नाटकातल्या या सर्व माणसांना स्वत:चं असं खास व्यक्तित्व आहे. तसेच ते सगळे इथल्या वैशिष्टयपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत यातील सर्व कथा म्हणजे टपो-या, सुगंधी मोग-याच्या फुलांचा गजरा, अस्सल कर्नाटकी गोफात गुंफलेला! या ‘सर्वसाधारण’ माणसांमध्ये जाणवणारं ‘असामान्यत्व’ लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं.


Maoism, Democracy and Globalisation – Ajay Gudavarthy


Countering Naxalism with Development – Santosh Mehrotra


Left Wing Extremisim and Human Rights – K.V.Thomas


राष्ट्रधर्म संरक्षक श्री नरेंद्र मोदी - प्रा। डॉ प्रभाकर पा पाठकसूत्रे चाणक्याची सूत्रे गवर्नेन्स ची - डॉ वसंत गोडसे

चाणक्यानी राज्याएवजी राष्ट्र ही संकल्पना निर्माण केली आणि प्रत्यक्षात उतरवली. चाणक्य हे उत्प्रेरक (catalyst) होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उत्प्रेरक ज्याप्रमाणे प्रक्रीयेपासून दूर होतो, त्याप्रमाणे चंद्रगुप्त मौर्य सिंहासनावर आरुड झाल्यावर चाणक्य मगधदेश सोडून परत आपल्या ज्ञानारजनाच्या तपश्चर्येत मग्न झाले. सूत्रांच्या आजच्या जगात काय संबंध किवा तारतम्य आहे, याचाही विचार महत्वाचा आहे. अर्थशास्त्र आणि सूत्र याचा अभ्यास केल्यावर एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे या ग्रंथामध्ये अर्थशास्त्रापेक्षा Governance या विषयावर अधिक चर्चा केलेली आहे.


कणाद ते कलाम - रंजन गर्गे

सभोवतालाबद्दलचे कुतूहल जागृत होऊन त्याची कारणे शोधण्याची परंपरा भारतात एकेकाळी होती. त्यातून अनेक सिद्धांत मांडले गेले. ते सर्व प्राचीन विज्ञान काही काळ गोठल्यासारखे झाले. परंतु उरोपीय आधुनिक विज्ञानाने पुन्हा येथील ज्ञानकवाडे उघडली आणि येथेही डॉ. कलामांसारखे वैज्ञानिक निर्माण झाले. हा संपन्न वारसा रंजन गर्गे यांनी येथे थोडक्यात सांगितला आहे.


कल्याणकारी अणु - श्रीराम मनोहर

अणुबद्दलच्या कल्पना वैज्ञानिक दृष्ट्या कशा घडत गेल्या, त्याबाबत वेगवेगळ्या वैज्ञानिकांचे संशोधन, त्यांनी केलेले प्रयोग याबाबत विस्तृत व रंजक माहिती डॉ. मनोहरांनी या पुस्तकात दिली आहे. पदार्थाची रचना व त्यांचे अतिसूश्म स्तरावरचे आकलन होण्यासाठी म्हणून वैज्ञानिकानी केलेल्या संशोधनाचा हा इतिहास म्हणजे मानवाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी सतत चालवलेल्या प्रयत्नांची एक छानशी झलकच होय. समाजाच्या सर्व थरावर सर्वाना समजेल अशी साधकबाधक माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. ‘कल्याणकारी अणु’ या पुस्तकात माध्यमातून अणुशक्ती क्षेत्रासंबधी चांगले प्रबोधन होऊ शकेल.


समीक्षा संचित - ज. द. जोगळेकर

ज.द.जोगळेकर यांनी ज्या ग्रंथांची समीक्षणे लिहिली त्यांच्या नुसत्या यादीवरून नजर फिरवली तरी जोगळेकरांच्या विचारविश्वाची परिपूर्ण कल्पना येते. जगाच्या इतिहासाचे भान, देशाच्या इतिहासातील सुर्वांक्षणाबद्दलचा अभिमान, पाश्यात्यांकडे पाहण्याची डोळस दृष्टी, राज्यक्रांत्या, महायुद्धे, रणनीती आणि लढायांमधील रचना, देशोदेशीच्या थोर-मोठ्या पराक्रमी नेत्यांची चरित्रे, लोकशाही समाजव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंध अशा अनेक विषयांचा एक मोठा पात उलगडण्याची ताकद या समीक्षणामध्ये आहे.


डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद - प्राचार्य श्याम अत्रे

भारतीय समाजमनात मुख्यत: अध्यात्म प्रेरित आहे. स्वामी विवेकानंदानी या अध्यात्म कृतिप्रवणतेची जोड दिली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी विषमतेचा दाह सहन करूनही संस्कृतिकतेस गौण समजले नाही. म्हणूनच समाजाच्या सर्व वर्णांना भेदाभेदविरहीत वातावरणात जगता यावे असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच बंधूतेच्या भावनेतूनच समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या दोन श्रेष्ठ मूल्यांचे जतन होऊ शकते असे त्यांचे प्रतिपादन होते. स्वामी विवेकानंदांनी अत्माग्लानीने ग्रासलेल्या समाजास जागृत केले. आणि अध्यात्माच्या सनातन शिकवणुकीशी पुन्हा जोडण्याचे मह्त्कार्य संपन्न केले.


एक आज़ाद इसम - अमन सेठी

दिल्ली देशाच्या राजधानीच आणि सत्तेची मिजास मिरवणार एक शहर. घर-दार-संसार काहीच नसणारी, रक्ताच्या नात्यातलहीकुणी नसणारी, फुटपाथवरच आयुष्य काढणारी एकाकी, लावारीस आणि अनोळखी माणस इथे जगतात, कष्टतात आणि मरूनही जातात. स्वत:ची कोणतीही नोंद न ठेवता. अशा माणसांमध्ये वावरून, त्यांच्याशी दोस्ती करून, त्यांच्यातलच बनून त्याचं असुरक्षित, भिरकावलेल, भेसूर, विदारक जगण समोर आणणार हे पुस्तक. धक्कादायक आणि वाचकाला घुसळून टाकणार. आपला देश, आपला समाज यांच्याबद्दलच्या आपल्या समजाना मुळापासून हादरवून टाकणार.


नशायात्रा - तुषार नातू

ही गोष्ट आहे एका अधोगतीची.
ब्राऊन शुगारसारख्या जालीम व्यसनांच्या आहारी जाऊन रस्त्यावर आलेल्या एका तरुणाची. मध्यमवर्गीय संस्कारातला तरुण व्यसनांमुळे घरदार-नातीगोती नव्हे, तर आपल माणूसपणही कसं हरवून बसतो त्याची.
पण मनात जिद्द असेल तर ही नाशायात्रा रोखून तो पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करू शकतो. अशाच एका माणसाची प्रांजळ आत्मकथा.


गोपीनाथ मुंडे लढवय्या लोकनेते

सामान्यांशी जोडलेला हा नेता कायम सामान्यांच्या मनात आपले कोणीतरी आहे, ही भावना जागवत जगला. त्यासाठी कोणाशीही संघर्ष करायला कधीच घाबरला नाही. असा निडर, बेडर नेता दुर्मिळच. वादळ अंगावर घ्यावीत, सहज पचवावीत आणि प्रत्येक वेळी नव्या ताकदीन उभ रहाव हे मुंडे याचं जगण बनल होत. त्यापायी होणाऱ्या त्रासाची मुंडेनी कधी फिकीर केली नाही. कधी चेहऱ्यावरच हसू मावळू दिल नाही. दिवंगत नेत्याच्या कार्याकतृत्वाचे मनोज्ञ दर्शन घडविणारा हा लेखप्रसंग कार्यकर्त्यांना प्रेरक ठरेल.


Proxy War in J & K A Winning Strategy - Brig. Hemant Mahajan

The roots of terrorism in India lie across the border in Pakistan and even Bangladesh. The whole of the government must act now. It is time to stop accepting the propaganda of our enemies. The government must expose the Kashmiri separatist leadership for what it really is – a threat to all liberal, democratic societies, supporters of subjugating women by seeking implementation of the Shariah, killers of young children by pushing them in front of violent mobs, violent criminals indulging in arson by burning schools and public property, tacit supporters of jehadi terror and hypocrites who use all the facilities of the Indian state while decrying it at the same time.
Satyamev Jayate - "Truth Alone Triumphs" - remains India's national motto. Yes, truth shall prevail in the end. But it can only prevail if it is brought out in the open first. can the government please start now?

Dimension

Library Home

Recent Arrivals

Events

Subject Areas

In view of the specified objectives of the organisation, the library has a collection of rare books on the following specific
subjects:

Hinduism Hindu Nationalism
Social Sciences Literature
Communism Ideology
Constitution of India Education
Geography and History Management

Booklets on specified subjects

Hard bound copies of periodicals like Ekta, Manoos, Samaj Prabodhan Patrika, New Yorker, Seminar etc.
Audio-Video Cassettes cover documentaries on various projects, speeches on socio-political subjects.
Video tapes of News Track and Eyewitness are also a part of this collection.
Late S. G. Majgaonkar's personal collection of 500 Books.

Membership & Guidelines

Watch Videos

For details, Contact

Mr. Dilip Navele (Librarian)
Tel. No. : 91-22-28450101/2/3
Email : dilipn@rmponweb.org