अभियानाविषयी

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था गेली चार दशके कार्यरत आहे. सामाजिक समस्यांचे व उपलब्ध पर्यायांचे सखोल अध्ययन, सहभागी घटकांचा समन्वय व त्यांचे योग्य प्रशिक्षण आणि यांद्वारे समस्या निराकरणाचा विधायक प्रयत्न हे प्रबोधिनीच्या कामाचे स्वरूप आहे. आणि याच कामाचा एक भाग असलेले ‘प्रबोधन वाचन-माला’ हे अभियान रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुरू केले आहे.

शालेय वयात निर्माण होणारी साहित्य वाचनाची सवय मुलांच्या व्यक्तिमत्वात महत्वाची भर घालते. मातृभाषेतील साहित्य हे तर थेट त्यांच्या अवती-भवतीच्या जगाचेच चित्रण असते.अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी आपल्या मातृभाषेतील साहित्य वाचून मुलांचे अनुभवविश्व नक्कीच समृद्ध होते. मराठी मातृभाषा असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रबोधन वाचन-माला हे राज्यस्तरीय अभियान सुरु करीत आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु होणाऱ्या या अभियानात शाळांमधील मुलांशी संवाद साधला जाणार आहे. पालकांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाणार आहे. पुढील पिढीत वाचनाची आवड निर्माण करणे हा केवळ भाषणाचा नव्हे तर थेट कृतीचा भाग झाला पाहिजे. याच उद्देशाने आम्ही सर्व सबंधित घटकांना एकत्र आणणारे एक व्यासपीठ प्रबोधन वाचन-मालेद्वारे उपलब्ध करुन देत आहोत.

अभियानात कोणाला सहभागी होता येईल?

  • सर्व माध्यमातील शाळा व शिक्षक
  • वाचनप्रेमी पालक
  • ग्रंथालये
  • साहित्यिक, प्रकाशक
  • वाचन चळवळीत काम करण्याची इच्छा असणारे नागरिक

शाळा नोंदणी

शाळा नोंदणी

पालक नोंदणी

पालक नोंदणी

ग्रंथालय नोंदणी

ग्रंथालय नोंदणी

स्वयंसेवक नोंदणी

स्वयंसेवक नोंदणी

पुस्तकांची यादी

आपण आपल्या ठिकाणी चालवत असलेल्या प्रबोधन वाचन-माला या उपक्रमासाठी उपयुक्त पुस्तकांची यादी

गट क्र १
इयत्ता १ली ते ४थी- यादी

गट क्र २
इयत्ता ५ वी ते ७वी- यादी

गट क्र ३
इयत्ता ८ वी ते १०वी- यादी