रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या प्रशिक्षण व संशोधन संस्थेसाठी
खालील उमेदवारांची आवश्यकता आहे.

विपणन व अभ्यागत संपर्क अधिकारी :

अभ्यागत व्यवस्थापन (Hospitality Industry) मधील पदवी अथवा पदविका, अभ्यागत संपर्क, कार्यक्रम समन्वय व प्रभावी संभाषणकला तसेच व्यावसायिक (कॉर्पोरेट) क्षेत्रात मार्केटींगचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.

वय मर्यादा – ४० वर्षे | अनुभव – किमान ३ वर्षे  |  रिक्त पदे – एक  | ठिकाण – भाईंदर

वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी :

पदवीधर, समाजातील विविध घटकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या नियोजनाचा व कार्यवाहीचा, कार्यक्रम संचालनाचा अनुभव. स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय संस्था यांच्या कार्यक्रमांची आखणी व त्यांची यशस्वी कार्यवाही करण्याची क्षमता असणे आवश्यक. प्रचार व प्रसिद्धीचे नियोजन, अहवाल लेखन, कार्यक्रम प्रस्ताव, प्रशासकीय कामकाज, दस्तऐवजीकरण इ. विषयक कौशल्ये आवश्यक.

वय मर्यादा – ४५ वर्षे | अनुभव – किमान ३ वर्षे  |  रिक्त पदे – एक  | ठिकाण – भाईंदर

कार्यकारी अधिकारी :

पदवीधर, समाजातील विविध घटकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या नियोजनाचा व कार्यवाहीचा, कार्यक्रम संचालनाचा अनुभव. स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय संस्था यांच्या कार्यक्रमांची आखणी व त्यांची यशस्वी कार्यवाही करण्याची क्षमता असणे आवश्यक. प्रशासकीय कामकाज, अहवाल लेखन, कार्यक्रम प्रस्ताव, दस्तऐवजीकरण इ. विषयक कौशल्ये आवश्यक.

वय मर्यादा – ४५ वर्षे | अनुभव – किमान ३ वर्षे  |  रिक्त पदे – एक  | ठिकाण – पुणे

वरील पदासाठी अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. स्वतंत्रपणे मराठी, हिंदी व इंग्रजीतून पत्रव्यवहार, कामाची आखणी व कार्यवाही तसेच जनसंपर्क व संगणकीय ज्ञान आवश्यक, शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार वेतन.

उमेदवाराने आपले अर्ज दि. २५.५.२०२३ पूर्वी  job@rmponweb.org या ई-मेलवर पाठवावेत.