Edition : तृतीय
Pages : 190
Price : 200
सुधीर नांदगांवकर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात माजी पंतप्रधान, जागतिक राजनीतीचे जाणकार, उत्कृष्ट संसदपटू व प्रभावी वक्ते असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या गैरराजकीय भाषणाचे संकलन केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक विषयांबरोबर डॉ. हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या समाजसुधारकांसंबंधात केलेली भाषणे व गीतरामायण, पत्रकार, लोकशाहीतील नागरिकांचा सहभाग अशा विविध विषयांवर भाषणांच्या स्वरुपात अटलजींनी केलेल्या चिंतनाचे दुर्मीळ संकलन या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आले आहे. ही भाषणे सामाजिक – सांस्कृतिक, लोकार्पण, शब्दांजली व सन्मान अशा चार भागांत देण्यात आली आहेत.