
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही गेल्या ४२ वर्षापासून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात सातत्याने कार्य करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे. प्रबोधिनीच्या वतीने मुख्यत्वे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते कर्मचारी, पदाधिकारी, विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांच्यासाठी क्षमता संवर्धनाचे उपक्रम आयोजित केले जातात. वर्तमान, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राष्ट्रीय प्रश्नांवर परिसंवाद, चर्चासत्रे, गटचर्चा व परिषदांचे आयोजन करणे हा ही प्रबोधिनीच्या कार्याचाच एक भाग आहे.
हेतू:
कोणत्याही संस्थेची ताकद ही तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. मंदिरे ही एक सामाजिक ऊर्जा देणारी केंद्रे आहेत. मंदिरांच्या व्यवस्थापनात मंदिर व्यवस्थापन समितीतील पदाधिकारी आणि मंदिरातील कर्मचारी यांच्यामधील परस्परसंबंध व समन्वय उत्तम असणे आवश्यक आहे. या दोन्ही घटकांमुळेच ‘मंदिर’ ही संस्था अधिक कार्यक्षम बनत असते. याच उद्देशाने दि. १५-१७ जुलै २०२५ रोजी प्रबोधिनीच्यावतीने ‘मंदिरातील पदाधिकारी व कर्मचारीवृंदांसाठी’ तीन दिवसीय निवासी ‘व्यवस्थापन आणि प्रशासन पदाधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
अभ्यासक्रम :
- कार्यालय व्यवस्थापन (संस्थेच्या कागदपत्रांचे दस्तावेजीकरण)+
- मंदिर आस्थापनेची धोरणे, घटना व नियम आणि कायदेशीर पालन
- परस्परसंबंध आणि सकारात्मक दृष्टिकोन
- आर्थिक व्यवस्थापन
- संवाद कौशल्ये
- आपत्ती व्यवस्थापन
- समाजमाध्यमांचा योग्य उपयोग (संस्कृती प्रसार)
- समाजाभिमुख उपक्रम
अपेक्षित सहभागी :
मंदिर आस्थापनेतील पदाधिकारी आणि कर्मचारीवृंद
Programme Date: दि. १५ – १७ जुलै २०२५
कालावधी :
मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून
गुरुवार, दि. १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत
नोंदणीची अंतिम तारीख:
सोमवार, दि. ७ जुलै २०२५
Batch Size
45
Medium
Marathi
नोंदणी शुल्कः
रु. ५०००/-मात्र (निवास, भोजन, अभ्यासक्रम साहित्यासह)
Resource persons
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
संपर्क :
दिलीप नवेले (ग्रंथपाल) ९९६७४ २९४५६ dilipn@rmponweb.org
अनिल पांचाळ ९९७५४ १५९२२ anilp@rmponweb.org