मंदिरे ही भक्तांच्या हृदयातील श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरात नियमित पूजा होणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा पुरविणे, स्वच्छता, दर्शन, प्रसाद, भोजन, निवास, पार्किंग, वृद्ध व दिव्यांग पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था, धार्मिक साहित्य विक्री, करमुक्त देणग्या व हिशेब व्यवस्था, सामाजिक कार्यातील सहभाग इ. विषयांवर त्या त्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीने बारकाईने अभ्यास केला पाहीजे. मंदिरांचा कारभार पारदर्शक असण्याबरोबरच मंदिरांच्या कारभारात ही गुणात्मक सुधारणा होणे आवश्यक आहे. कोणत्याही संस्थेची ताकद ही तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. मंदिर प्रशासनाला अनेक समस्यांनांही सामोरे जावे लागत आहे. त्यावरील उपाय आणि अन्य अनुषंगीक विषय समजून घेण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित दोन दिवसीय निवासी ‘मंदिर : विश्वस्त आणि संचालक मंडळ पदाधिकारी दिशादर्शन शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
Learning objectives:
अभ्यासक्रम :
- मंदिर : विश्वस्तांची भूमिका आणि जबाबदाऱ्या
- मंदिराचे संचालन आणि प्रशासन
- आधुनिक मंदिरांचे व्यवस्थापन व कार्यपद्धती
- मंदिर व्यवस्थापनातील अर्थशास्त्र आणि नियोजन
- मंदिर विषयक कायदे
- चर्चासत्र
Who can attend
अपेक्षित सहभागी : मंदिर विश्वस्त, अध्यक्ष व पदाधिकारी, आणि या विषयात आवड असलेले सामाजिक कार्यकर्ते
Programme Dates: दि. २१-२२ ऑक्टोबर २०२४
Timings: सोमवार, दि. २१ ऑक्टोबर सकाळी १०.०० ते मंगळवार, दि. २२ ऑक्टोबर सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
४५
Medium:
मराठी
Fee Details
शुल्क : रु. ३०००/- (निवास, भोजन, प्रशिक्षण साहित्य)
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Dilip Navele 99674 29456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal – 9975415922, anilp@rmponweb.org