मंदिरे ही भक्तांच्या हृदयातील श्रद्धा आणि विश्वास दृढ करतात. त्यामुळे मंदिरात नियमित पूजा होणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा पुरविणे, स्वच्छता, दर्शन, प्रसाद, भोजन, निवास, पार्किंग, वृद्ध व अपंग पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था, धार्मिक साहित्य विक्री, करमुक्त देणग्या व हिशेब व्यवस्था, सामाजिक कार्यातील सहभाग इ. विषयांवर त्यात्या मंदिराच्या व्यवस्थापन समितीने बारकाईने अभ्यास केला पाहीजे. मंदिरांचा कारभार पारदर्शक असण्याबरोबरच मंदिरांच्या कारभारात ही गुणात्मक सुधारणा होणे आवश्यक आहे. कोणत्याही संस्थेची ताकद ही तिच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. मंदिर प्रशासनाला अनेक समस्यांनांही सामोरे जावे लागत आहे. त्यावरील उपाय आणि अन्य अनुषंगीक विषय समजून घेण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित दोन दिवसीय निवासी ‘मंदिर व्यवस्थापन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
Learning objectives:
- मंदिर व्यवस्थापन मंडळाची भूमिका आणि जबाबदाऱ्या (मंदिरांचे व्यवस्थापन, संचालन आणि प्रशासन)
- मंदिर वास्तुकलेचे जतन, अनुष्ठान, कार्यक्रम प्रबोधन व कायदा सुव्यवस्था
- मंदिराच्या सुरक्षिततेसाठी व्यावसायिक व आपातकालीन व्यवस्थापन
- घनकचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधा
- मंदिरांचा विकास, प्रचार आणि प्रसार
- सण आणि उत्सवाच्या दिवसांमध्ये गर्दीचे नियोजन.
Who can attend
मंदिर समिति विश्वस्त, अध्यक्ष व पदाधिकारी, आणि या विषयात आवड असलेले सामाजिक कार्यकर्ते
Programme Dates: दि. १६-१७ मार्च २०२४
Timings: शनिवार, दि. १६ मार्च २०२४ सकाळी १०.०० ते रविवार, दि. १७ मार्च २०२४ सायंकाळी ०५.०० पर्यंत
Batch Size:
४०
Medium:
मराठी
Fee Details
शुल्क रु. २५००/- प्रति व्यक्ति (जी.एस.टी.करासहित)
Resource Person
तज्ज्ञ मार्गदर्शक
Programme Coordinator(s)
For any query please contact
Dilip Navele 99674 29456, dilipn@rmponweb.org
Anil Panchal – 9975415922, anilp@rmponweb.org